जाणून घ्या…कोण आहे प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील ?

प्रतीक्षा बागडी (Pratiksha Bagdi ) –

पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेती प्रतीक्षा रामदास बागडी ही 21 वर्षांची असून तिचं वजन 76 किलो इतकं आहे. ती सांगलीच्या तुंग गावची महिला पैलवान आहे. ती सांगली शहरातील यशवंत नगरमधील वसंतदादा कुस्ती केंद्र मध्ये सराव करते. तिला प्रशिक्षक सुनील चंदन शिवे यांच्याकडून मार्गदर्शन केलं जातं. प्रतीक्षा बागडीचे  वडील रामदास बागडी हे पोलीस हवालदार आहेत. प्रतीक्षाने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आतापर्यंत दोन पदकाची कमाई केली आहे . ती ढाक, टांग मारणे डावात तरबेज आहे.

वैष्णवी पाटील (Vaishanavi Patil)-

दुसरीकडे पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपविजेत्या ठरलेली कल्याणती वैष्णवी पाटील ही 19 वर्षांची आहे. ती कल्याण बाजूलाच असलेल्या मांगरूळ गावची महिला पैलवान आहे. ती कल्याणच्या नांदीवली परिसरातील जय बजरंग तालीम संघ येथे सराव पंढरीनाथ ढोणे, वसंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. लहानपणा पासूनच कुस्तीची आवड असणाऱ्या वैष्णवी पाटील हिने आतापर्यंत सहा ते सात राज्य, राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. वैष्णवी पाटीलचे वडील दिलीप पाटील आणि आई पुष्पा पाटील यांच्या घरातही पहिल्यापासूनच कुस्तीचा ओढा होता. त्यामुळे वैष्णवीला आवड निर्माण झाली. तिने विशाखापट्टणम येथे सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप ब्राँझ मिडलची कमाई. तिला प्रशिक्षक प्रज्वलित ढोणे यांचे मार्गदर्शन मिळते. ती सालतु डावात तरबेज आहे.

दोन्ही पैलवान रुम पार्टनर

प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील या हरियाणाच्या इसारमध्ये जवळपास 5-6 महिने रूम पार्टनर असल्याचे समजते. त्यामुळे दोघींना एकमेकांच्या डावपेचांबद्दल अंदाज आहे.

Leave a Comment