पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक; सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजारांच्या पार.

नवीदिल्ली, दि. २२ –
भारतात करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यात मंगळवारी भारतात करोनाचे ११३४ नवीन रुग्ण आढळले आहेत व ज्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याने करोना संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेतली. 
या बैठकीला आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यासह अनेक आरोग्य अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

भारतातील एकंदर परिस्थितीचा आढावा घेतल्यास सक्रिय रुग्णांची संख्या ७०२६ वर पोहोचली आहे. दुसरीकडे, देशात आतापर्यंत करोना लसीचे २२०.६५ कोटी डोस देण्यात आले आहेत. २८ फेब्रुवारी २०२० रोजी देशात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून देशात ४.४६ कोटींहून अधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत. ज्यामध्ये आत्तापर्यंत ५ लाखांहून अधिक संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. करोनासोबतच आता
‘एच३एन२’ इन्फ्लूएंझा विषाणूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. ‘एच३एन२’ आत्तापर्यंत देशात १० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अर्थातच सरकारची चिंता वाढली आहे.

राज्यांतील स्थितीरुग्णरुग्णाचा मृत्यूउपचार सुरू
महाराष्ट्र२८०१४८९
गुजरात१७६९१६
केरळ११३१०२५
कर्नाटक : ६२४
राज्यांतील करोना स्थिती
एकूण रुग्ण ४.४६ कोटी
सक्रिय रुग्ण७०२६
रुग्ण५.३२ लाख
रिकव्हरी४.४१ कोटी
देशातील H3N2 स्थिती

Leave a Comment