पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक; सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजारांच्या पार.

सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजारांच्या पार

नवीदिल्ली, दि. २२ –भारतात करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यात मंगळवारी भारतात करोनाचे ११३४ नवीन रुग्ण आढळले आहेत व ज्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याने करोना संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यासह अनेक आरोग्य अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. भारतातील एकंदर परिस्थितीचा आढावा घेतल्यास सक्रिय रुग्णांची संख्या ७०२६ वर पोहोचली आहे. दुसरीकडे, देशात आतापर्यंत करोना लसीचे २२०.६५ कोटी डोस देण्यात आले आहेत. २८ फेब्रुवारी २०२० रोजी देशात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून देशात ४.४६ कोटींहून अधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत. ज्यामध्ये आत्तापर्यंत ५ लाखांहून अधिक संक्रमितांचा मृत्यू … Read more

तब्बल चार वर्षांनंतर पुणे- मुंबई विमानसेवेचे उड्डाण.. जाणून घ्या वेळ?

तब्बल चार वर्षांनंतर उड्डाण होत आहे. एअर इंडिया ही विमानसेवाच

पुणे, ता. १७ : पुणे-मुंबई विमानसेवेचे तब्बल चार वर्षांनंतर उड्डाण होत आहे. एअर इंडिया ही विमानसेवा सुरू करीतअसून, पुणेविमानतळाच्या समर शेड्यूलमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. येत्या २६ मार्चपासून पुण्याहून मुंबईसाठी ही सेवा सुरू होत आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला एका तासांत पोचणे शक्य होणार आहे. यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.  पुणे-मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू करण्यासाठी पुणे विमानतळ प्रशासन मागील काही दिवसांपासून प्रयत्न करीत आहे. विंटरशेड्यूलमध्ये पुणे व मुंबई विमानतळावर स्लॉट राखीव ठेवला होता. मात्र त्यावेळी एअर इंडियाकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नसल्याने तो स्लॉट रद्द केला. विमानसेवेचा फायदा काय? ■ एका तासात मुंबई गाठणे शक्य; परिणामी प्रवासाच्या वेळेत मोठी बचत ■ मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानाने पुढचा प्रवास करणे सोपे ■ कार्गो सेवेलादेखील चालना मिळण्याची शक्यता. काय आहेत वेळा ? पहिली सेवा ‘एयर इंडिया’ची -पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे २००८ मध्ये पुणे-मुंबई-दिल्ली अशी दररोज विमानसेवा सुरू होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतहोता. त्यानंतर २०१७ मध्ये जेट एअरवेजने पुणे ते मुंबई थेट विमानसेवा सुरू केली. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, ती सेवा काही कारणांमुळे २०१९ मध्ये बंद झाली. त्यानंतर विमानसेवा सुरू करण्याबाबत केवळ चर्चा झाल्या. प्रत्यक्षात मात्र ही विमानसेवा चार वर्षानंतर सुरू होत आहे.

Old Pension Scheme Strike | राज्य सरकारी कर्मचारी का संपावर जात आहे ?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमूदत संप पुकारला : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. या कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. जुन्या पेन्शनचा मुद्दा सभागृहात चर्चेत आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल राज्याचं हित महत्वाचं असल्याचं सांगतानाच, इतर पर्यायांसाठी कर्मचाऱ्यांशी चर्चेस तयार असल्याचं म्हटलंय. जुनी पेन्शनबद्दल … Read more