पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक; सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजारांच्या पार.
नवीदिल्ली, दि. २२ –भारतात करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यात मंगळवारी भारतात करोनाचे ११३४ नवीन रुग्ण आढळले आहेत व ज्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याने करोना संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यासह अनेक आरोग्य अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. भारतातील एकंदर परिस्थितीचा आढावा घेतल्यास सक्रिय रुग्णांची संख्या ७०२६ वर पोहोचली आहे. दुसरीकडे, देशात आतापर्यंत करोना लसीचे २२०.६५ कोटी डोस देण्यात आले आहेत. २८ फेब्रुवारी २०२० रोजी देशात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून देशात ४.४६ कोटींहून अधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत. ज्यामध्ये आत्तापर्यंत ५ लाखांहून अधिक संक्रमितांचा मृत्यू … Read more