Old Pension Scheme Strike | राज्य सरकारी कर्मचारी का संपावर जात आहे ?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमूदत संप पुकारला : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. या कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे.

जुन्या पेन्शनचा मुद्दा सभागृहात चर्चेत आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल राज्याचं हित महत्वाचं असल्याचं सांगतानाच, इतर पर्यायांसाठी कर्मचाऱ्यांशी चर्चेस तयार असल्याचं म्हटलंय. जुनी पेन्शनबद्दल सरकारची काय भूमिका आहे आणि काय शक्यता आहेत याबाबत जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यास सरकार नकारात्मक नाही, असं म्हणताना देवेंद्र फडणवीसांनी जुनी पेन्शनमुळे पडणाऱ्या आर्थिक बोजाचे परिणाम २०३० नंतर दिसतील. त्यामुळे राज्यकर्ते म्हणून भविष्याचा विचार व्हायला हवा.

कुढे चालु आहे संप किंवा आंदोलन ?

मुंबई : राज्यभरात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. या संपात तब्बल 18 लाख सरकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. यात राज्य सरकारी, निम सरकारी,जिल्हा परिषद, महसूल, आरोग्यविभाग महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या संपामुळे आरोग्य विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. रूग्णांना सुविधा मिळत नाहीयेत. अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आजही हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे. ठिकठिकाणी सरकार विरोधात निदर्शनं केली जाणार आहेत. तसंच रास्ता रोकोही करण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे दहावी बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत जरी सुरू असल्या तरी पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने दहावी आणि बारावी बोर्डाचा निकालास विलंब होऊ शकतो.

काय आहे OPS आणि NPS ?

जुनी पेन्शन स्किमला OPS म्हणजे ओल्ड पेन्शन स्किम म्हटलं जातं. नव्या पेन्शन स्किमला NPS म्हणजे न्यू पेन्शन स्किम म्हटलं जातं. महाराष्ट्रात 2005 पासून जुनी पेन्शन स्किम बंद झालीय.

जुनी पेन्शन (OPS)नवीन पेन्शन (NPS)
महाराष्ट्रात २००५ पासून जुनी पेन्शन बंद२००५ पासून महाराष्ट्रात लागू
जर तुमचा पगार ३० हजार , तर निवृत्तीनंतर १५ हजार पेन्शन३० हजार पगाराला फक्त २७०० रुपये पेन्शन बसते.
तुमच्या पगारातून रक्कम कपात होत नव्हती. तुमच्या दरमहा 10 टक्के आणि सरकार 14 टक्के रक्कम पेन्शन म्हणून जमा करते.
ग्रॅज्युटी, जीपीएफ, महागाई भत्ता, मृत्यूनंतर वारसदारालाही पेन्शन मिळत होती. अशी कोणतिही सवलत लागू नाही
पैसा हा सरकारी योजना किंवा वित्तीय संस्थांमध्ये लावलेला असायचा, त्यामुळे त्याची हमी होती. अप्रत्यक्षपणे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात होणारा पैसा शेअर बाजारात लावला जातो. यात हमीची शक्यता नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.

Leave a Comment